काळ MCQ Quiz in मराठी - Objective Question with Answer for काळ - मोफत PDF डाउनलोड करा

Last updated on Apr 4, 2025

पाईये काळ उत्तरे आणि तपशीलवार उपायांसह एकाधिक निवड प्रश्न (MCQ क्विझ). हे मोफत डाउनलोड करा काळ एमसीक्यू क्विझ पीडीएफ आणि बँकिंग, एसएससी, रेल्वे, यूपीएससी, स्टेट पीएससी यासारख्या तुमच्या आगामी परीक्षांची तयारी करा.

Latest काळ MCQ Objective Questions

Top काळ MCQ Objective Questions

काळ Question 1:

'प्रथम ताख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो?

  1. भूतकाळ 
  2. भविष्यकाळ 
  3. रीती भूतकाळ 
  4. वर्तमानकाळ

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : वर्तमानकाळ

काळ Question 1 Detailed Solution

उत्तर - प्रथम ताख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो.


Important Points
आख्यात विकार
 - लिंग, वचन व पुरुष यामुळे क्रियापदाच्या रुपात जो सात प्रकारे बदल होतो त्याला आख्यात विकार असे म्हणतात कारण संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. व त्यात जो बदल होतो त्याला विकार असे म्हणतात. उदा. असतो, असे, असेल

काळ क्रियापदाचे रूप आख्याताचे नाव
वर्तमानकाळ असतो प्रथम - ता - आख्यात
भूतकाळ झाला ला - आख्यात
रीतीभूतकाळ असे ई - आख्यात
भविष्यकाळ असेल ईल - आख्यात
आज्ञार्थ असू ऊ - आख्यात
विध्यर्थी असावा वा - आख्यात
संकेतार्थ असता द्वितीय - ता - आख्यात

काळ Question 2:

'तुम्ही सगळे मिळून हे काम पूर्ण करा' आख्यात ओळखा.

  1. लाख्यात
  2. प्रथम ताख्यात
  3. ऊ-आख्यात
  4. द्वितीय ताख्यात

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : ऊ-आख्यात

काळ Question 2 Detailed Solution

उत्तर- तुम्ही सगळे मिळून हे काम पूर्ण करा या वाक्यात ऊ-आख्यात आहे.

वरील वाक्यातील करा हे आज्ञार्थी क्रियापद आहे आणि आज्ञार्थी क्रियापदांचा आख्यात ऊ-आख्यात असतो म्हणून या वाक्यातील आख्याताचे नाव ऊ-आख्यात हे होईल.

Important Pointsआख्यात विकार - लिंगवचन व पुरुष यामुळे क्रियापदाच्या रुपात जो सात प्रकारे बदल होतो त्याला आख्यात विकार असे म्हणतात कारण संस्कृतमध्ये क्रियापदाला  आख्यात असे म्हणतात व त्यात जो बदल होतो त्याला विकार असे म्हणतात. उदा. केला, केली, केले         

काळ क्रियापदाचे रूप आख्याताचे नाव
वर्तमानकाळ करतो प्रथम - ता - आख्यात
भूतकाळ केला ला - आख्यात
रीतीभूतकाळ करीत असे ई - आख्यात
भविष्यकाळ करेल ईल - आख्यात
आज्ञार्थ करा ऊ - आख्यात
विध्यर्थी करावा वा - आख्यात
संकेतार्थ करता द्वितीय - ता - आख्यात

काळ Question 3:

'त्याने पत्र लिहिले' या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा.

  1. त्याने पत्र लिहावे. 
  2. तो पत्र लिहीत असतो.
  3. तो पत्र लिहितो.
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : तो पत्र लिहितो.

काळ Question 3 Detailed Solution

काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात.

काळाचे  मुख्य तीन प्रकार पडतात.

  1. वर्तमानकाळ 
  2. भूतकाळ 
  3. भविष्यकाळ 

वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात.

  1. साधा 
  2. अपूर्ण 
  3. पूर्ण 
  4. रीती 

Important Points

साधा वर्तमानकाळ -

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असे समजून येते तेव्हा त्या वर्तमानकाळाला 'साधा वर्तमानकाळ' असे म्हणतात. 

उदा. (१) गीता चहा पिते.(२)रमेश टी.व्ही. पाहतो.

वरील 'त्याने पत्र लिहिले' या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप तो पत्र लिहितो असे होते.

अशा प्रकारे वरील तो पत्र लिहितो हा योग्य पर्याय आहे.

काळ Question 4:

खालील वाक्यातील काळ ओळखा? - लतादीदी सुरेल भावगीत गात होत्या.'

  1. पूर्ण भूतकाळ
  2. साधा भूतकाळ
  3. अपूर्ण भूतकाळ
  4. रीती भूतकाळ

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : अपूर्ण भूतकाळ

काळ Question 4 Detailed Solution

काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात.

काळाचे  मुख्य तीन प्रकार पडतात.

  1. वर्तमानकाळ 
  2. भूतकाळ 
  3. भविष्यकाळ 

वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात.

  1. साधा 
  2. अपूर्ण 
  3. पूर्ण 
  4. रीती 

Important Points

अपूर्ण भूतकाळ / चालू भूतकाळ -

एखाद्या वाक्याचा क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळात जी क्रिया चालू होती किंवा ज्या गोष्टी बद्दल बोलत आहे ती गोष्ट घडत होती असा बोध होतो त्या भूतकाळाला 'अपूर्ण भूतकाळ' किंवा 'चालू भूतकाळ' असे म्हणतात.

उदा. (१) रमेश आंबा खात होता.(२) सुरेश क्रिकेट खेळत होता.

वरील दिलेल्या लतादीदी सुरेल भावगीत गात होत्या या वाक्यातील काळ अपूर्ण भूतकाळ आहे.

अशा प्रकारे वरील अपूर्ण भूतकाळ हा योग्य पर्याय आहे.

काळ Question 5:

दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

कोळी जाळे विणत असेल. (रीति भविष्यकाळ)

  1. विणत असतो
  2. विणत जाईल
  3. विणत होता
  4. विणत असे

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : विणत जाईल

काळ Question 5 Detailed Solution

उत्तर- विणत जाईल

काळ - एखाद्या वाक्यामध्ये ज्याप्रमाणे क्रीयापदावरून आपल्याला क्रियेचा बोध होतो त्याचप्रमाणे आपल्याला वाक्यातील काळाचा (वेळेचा) बोध ज्या संकल्पनेवरून लक्षात येतो त्या संकल्पनेला आपण 'काळ' असे म्हणतो. 

काळाचे  मुख्य तीन प्रकार पडतात.

  1. वर्तमानकाळ 
  2. भूतकाळ 
  3. भविष्यकाळ 

वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात.

  1. साधा 
  2. अपूर्ण 
  3. पूर्ण 
  4. रीती 

भविष्यकाळ - वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे भविष्यात घडणार आहे असा बोध होतो अशा काळाला 'भविष्यकाळ' असे म्हणतात.

उदा. (१) मी डॉक्टर बनेल.

Important Pointsरीति भविष्यकाळ - जेव्हा एखाद्या वाक्यातून क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल असे दर्शिवले जाते तर त्या काळाला 'रिती भविष्यकाळ' किंवा 'चालू पूर्ण भविष्यकाळअसे म्हणतात.

उदा.

(१) पूजा रोज अभ्यास करीत जाईल.

(२) मी वाचत जाईल.

वरील दिलेल्याप्रमाणे कोळी जाळे विणत असेल हे वाक्य रीति भविष्यकाळात करताना कोळी जाळे विणत जाईल असे होते.

काळ Question 6:

'आम्ही सकाळी लवकर उठू का?' या वाक्यातील आख्यात ओळखा.

  1. ई-आख्यात
  2. ऊ-आख्यात
  3. ईलाख्यात
  4. प्रथम ताख्यात

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : ऊ-आख्यात

काळ Question 6 Detailed Solution

आम्ही सकाळी लवकर उठू का? या वाक्यात ऊ-आख्यात आहे. 

वरील वाक्यातील उठू हे आज्ञार्थी क्रियापद आहे आणि आज्ञार्थी क्रियापदांचा आख्यात ऊ-आख्यात असतो म्हणून या वाक्यातील आख्याताचे नाव ऊ-आख्यात हे होईल.

Additional Informationआख्यात विकार - लिंग, वचन व पुरुष यामुळे क्रियापदाच्या रुपात जो सात प्रकारे बदल होतो त्याला आख्यात विकार असे म्हणतात कारण संस्कृतमध्ये  क्रियापदाला  आख्यात असे म्हणतात. व त्यात जो बदल होतो त्याला विकार असे म्हणतात. उदा. उठला, उठली, उठले

काळ

क्रियापदाचे रूप

आख्याताचे नाव

वर्तमानकाळ

उठतो

प्रथम - ता - आख्यात

भूतकाळ

उठला

ला - आख्यात

रीतीभूतकाळ

उठे

ई - आख्यात

भविष्यकाळ

उठेल

ईल - आख्यात

आज्ञार्थ

उठ

ऊ - आख्यात

विध्यर्थी

उठावा

वा - आख्यात

संकेतार्थ

उठता

द्वितीय - ता - आख्यात

काळ Question 7:

सुरेशने गाणे गायलेले असेल. या वाक्याचा काळ ओळखा.

  1. अपूर्ण भविष्यकाळ
  2. रीती भविष्यकाळ
  3. पूर्ण भविष्यकाळ
  4. साधा भविष्यकाळ

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : पूर्ण भविष्यकाळ

काळ Question 7 Detailed Solution

उत्तर - सुरेशने गाणे गायलेले असेल. हे पूर्ण भविष्यकाळ असलेले वाक्य आहे.

सुरेशने गाणे गायलेले असेल. या वाक्यात सुरेशची गाणे गाण्याची क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली आहे म्हणून हे वाक्य पूर्ण भविष्यकाळाचे होईल.

पूर्ण भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळलो असेन.

Important Pointsकाळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.

  1. वर्तमानकाळ
  2. भूतकाळ
  3. भविष्यकाळ

वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमानकाळ असतो.

भूतकाळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात.

भविष्यकाळ - क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.

साधा भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी साधा भविष्यकाळ असतो. उदा. सुरेशन गाणे गाईल.

अपूर्ण / चालू भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदा. सुरेश गाणे गात असेल.

रीती भविष्यकाळ - भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. उदा. सुरेश गाणे गात जाईल.

काळ Question 8:

'ला -आख्यात' वरून कोणता काळ ओळखला जातो?

  1. भूतकाळ 
  2. रीती भूतकाळ
  3. भविष्यकाळ
  4. वर्तमानकाळ

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : भूतकाळ 

काळ Question 8 Detailed Solution

उत्तर - ला - आख्यात वरून कोणता भूतकाळ ओळखला जातो.

Important Pointsआख्यात विकार - लिंग, वचन व पुरुष यामुळे क्रियापदाच्या रुपात जो सात प्रकारे बदल होतो त्याला आख्यात विकार असे म्हणतात कारण संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. व त्यात जो बदल होतो त्याला विकार असे म्हणतात. उदा. पडतो, पडू, पडला

काळ क्रियापदाचे रूप आख्याताचे नाव
वर्तमानकाळ पडतो प्रथम - ता - आख्यात
भूतकाळ पडला ला - आख्यात
रीतीभूतकाळ पडत असे ई - आख्यात
भविष्यकाळ पडेल ईल - आख्यात
आज्ञार्थ पडू ऊ - आख्यात
विध्यर्थी पडावा वा - आख्यात
संकेतार्थ पडता द्वितीय - ता - आख्यात

काळ Question 9:

सर्वकाळी व सर्वत्र सत्य असलेले वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात लिहाल.

  1. चालू वर्तमानकाळ
  2. पूर्ण वर्तमानकाळ
  3. साधा वर्तमानकाळ
  4. रीती वर्तमानकाळ

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : साधा वर्तमानकाळ

काळ Question 9 Detailed Solution

उत्तर - सर्वकाळी व सर्वत्र सत्य असलेले वाक्य साध्या वर्तमानकाळात लिहितात.

शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकालसत्य, सुविचार नेहमी साध्या वर्तमानकाळात असतात. उदा. सूर्य पूर्वेला उगवतो. (नित्य घटना), पाण्याचा उत्कलनांक १००° C आहे. (शास्त्रीय नियम)

Important Pointsकाळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.

  1. वर्तमानकाळ
  2. भूतकाळ
  3. भविष्यकाळ

वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमानकाळ असतो.

भूतकाळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात

भविष्यकाळ - क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.

वर्तमानकाळाचे चार उपप्रकार पडतात.

  1. साधा वर्तमान काळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो. उदा. मी खेळतो.
  2. अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ - जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो. तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमानकाळ असतो. उदा. मी खेळत आहे.     
  3. पूर्ण वर्तमान काळ - जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळलो आहे.
  4. रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ - वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला रीती वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळत असतो.

काळ Question 10:

संनिहित भविष्यकाळ म्हणजे काय ? 

  1. ​भूतकाळातील घटना वर्तमानकाळात सांगतात. 
  2. स्थिर सत्य सांगण्यासाठीचा काळ.
  3. लगेच क्रिया सुरु होणार असे दाखविणारा काळ.
  4. यापैकी नाही.

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : लगेच क्रिया सुरु होणार असे दाखविणारा काळ.

काळ Question 10 Detailed Solution

उत्तर व स्पष्टीकरण - लगेच क्रिया सुरु होणार असे दाखविणारा काळ.
  • साधा वर्तमानकाळ – मी नाचतो. 

 

  • स्थिर वर्तमानकाळ – स्थिर सत्य सांगण्यासाठीचा काळ . 

       उदा. पावसाळ्यात वातावरण थंड असते. 

  • ऐतिहासिक वर्तमानकाळ – भूतकाळातील घटना वर्तमानकाळात सांगतात. 

        उदा. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो. 

  • संनिहित भविष्यकाळ – लगेच क्रिया सुरु होणार असे दाखविणारा काळ. 

         उदा. तू हो पुढे मी तुला रस्त्यात गाठतो.    

Get Free Access Now
Hot Links: teen patti 100 bonus teen patti joy vip teen patti master king teen patti club apk teen patti real cash