रात्री उशीरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत. - या वाक्यातील आम्ही हा शब्द ________ आहे.

This question was previously asked in
Bombay High Court Clerk Official Paper (Held On: 26 Feb, 2023)
View all Bombay High Court Clerk Papers >
  1. क्रियापद
  2. विशेषण
  3. नाम
  4. सर्वनाम

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : सर्वनाम
Free
Ancient History of India
1.3 K Users
10 Questions 10 Marks 8 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - रात्री उशीरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत. या वाक्यातील आम्ही हे सर्वनाम आहे आणि ते प्रथम पुरुषवाचक या प्रकारात मोडते.

रात्री उशीरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत. या वाक्यात बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी आम्ही या सर्वनामाचा वापर करत आहे आणि असे सर्वनाम प्रथम पुरुषवाचक असते.

पुरुषवाचक सर्वनाम - पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण तीन उपप्रकार पडतात.

  • प्रथम पुरुषवाचक सर्वनाम - बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात. उदा. मी, आम्ही, आपण, स्वत:           
    • वाक्य - मी मुंबईला जाणार आहे.
  • व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम - जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे. त्याचा उल्लेख करतांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदा. तो, तुम्ही, आपण, स्वतः इ         
    • वाक्य - तुम्ही घरी कधी येणार आहात?
  • तृतीय पुरुषवाचक सर्वनाम - जेव्हा बोलणारा दुसर्‍या व्यक्तीशी बोलतांना व तिसर्‍या व्यक्तींचा उल्लेख करतांना ज्या, ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामांस तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. उदा. तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
    • वाक्य - ते सर्वजण इथेच येत आहेत.

Important Pointsसर्वनाम - वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

सर्वनामाचे एकूण मुख्य सहा प्रकार आहेत.

  1. पुरुषवाचक सर्वनाम
  2. दर्शक सर्वनाम
  3. संबंधी सर्वनाम
  4. प्रश्नार्थक सर्वनाम
  5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम
  6. आत्मवाचक सर्वनाम

दर्शक सर्वनाम - जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात.  उदाहरण - हा, ही, हे, तो, ती, ते.

संबंधी सर्वनाम - गौण वाक्यातील जो, जी, जे ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत कारण ती उल्लेख केलेल्या एखाद्या नामाशी संबंधीत असतात तर मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या ही अनुसंबंधी सर्वनामे आहेत. कारण अनु चा अर्थ नंतरचा असा होतो त्यामुळे दर्शक सर्वनामे संबंधी सर्वनामानंतर येऊन ती संबंधी सर्वानामांशी संबंध दर्शवितात म्हणून त्यांना अनुसंबंधी सर्वनामे म्हणतात. उदा - जो, जी, जे, ज्या

प्रश्नार्थक सर्वनाम - ज्या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. असा प्रश्न विचारल्यास उत्तर नाम येते. उदा. कोण, काय, कोणी

सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम - कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. या सर्वनामांना सामान्य सर्वनाम असेसुद्धा म्हणतात.  उदा.कोणी कोणास हसू नये. 

आत्मवाचक सर्वनाम - आपण, स्वतः, निज या सर्वनामाचा वापर स्वतः या अर्थाने केल्यास ती आत्मवाचक सर्वनामे होतात. अशा वेळी ती कर्त्यानंतर वापरली जातात. उदा. तो आपण होऊन माझ्याकडे आला.

Additional Information

  • क्रियापद - वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
  • विशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.
  • नाम - व्यक्तीच्या, स्थळांच्या, प्राण्यांच्या नावाला दिलेले जे नाव असते त्याला नाम असे म्हणतात. उदा. महेश, मुंबई, पर्वत इत्यादी
Latest Bombay High Court Clerk Updates

Last updated on Jun 25, 2025

->Bombay HC Clerk Rejection List 2025 has been released for 10,218 candidates who haven't filled the application fees.

-> Bombay High Court Clerk 2025 Eligibility List was out now for the screening test.

-> Bombay High Court Clerk 2025 Notification has been released.

-> A total number of 129 vacancies have been released. Candidates can apply from 22nd January to 5th February 2025. 

-> The High Court reserves the right to adopt an appropriate method/methods for the shortlisting of the candidates at any stage of recruitment process.

-> The candidates can check out the Bombay High Court Clerk Cut-Off from here. 

More शब्दांच्या जाती Questions

More शब्द Questions

Get Free Access Now
Hot Links: teen patti all teen patti real cash apk teen patti yas teen patti win